बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी, पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:47+5:302021-07-10T04:23:47+5:30
बीड : जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवार, शुक्रवारी दोन दिवस समाधानकारक पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. ...
बीड : जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवार, शुक्रवारी दोन दिवस समाधानकारक पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान आष्टी, शिरूर, बीड तालुक्यांत गुरुवारी सायंकाळनंतर चांगला पाऊस झाला. तर शुक्रवारी अंबाजोगाई, बीड, शिरूर, गेवराई तालुक्यांत हजेरी लावली.
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मोठा वादळी पाऊस झाला. या पावसाने व सुसाट वाऱ्याने राडी सर्कलमधील उसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, गेवराई तालुक्यात शुक्रवारी शिरसदेवी परिसरात दोन तास रिमझिम पाऊस झाला. बीड, आष्टी, शिरूर तालुक्यांच्या काही भागांत शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. हा पाऊस खरीप पिकांना पोषक आहे. यामुळे शेतक-यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. तर, जिल्ह्याच्या काही भागात अजूनही दु्ष्काळाचे सावट असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.