नवे झाडे जगवण्यासाठी चक्क जुन्याची तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:03+5:302021-07-28T04:35:03+5:30
आष्टी तालुक्यातील वनविभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून नवीन झाडे लावली जातात. पण त्यातील किती जगतात याचा आकडा ...
आष्टी तालुक्यातील वनविभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून नवीन झाडे लावली जातात. पण त्यातील किती जगतात याचा आकडा दिसत नाही. पण हीच नवीन झाडे लावण्यासाठी देवळाली अंतर्गत पिंपरी घाटा येथील डोंगरात सध्या जुनी झाडे तोडून त्याचे संरक्षण कवच म्हणून रोडच्या बाजूला सत्तर ठिकाणी झाडे तोडून तारांच्या साह्याने कंपाऊंड केले आहे. या प्रकारावरून चक्क कुंपनच शेत खात असल्याचे दिसून आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ही झाडे तोडून त्याचा कंपाऊंडसाठी वापर केला याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी साळवे यांनी केली आहे. याबाबत या नियत क्षेत्रातील वनरक्षक मोलेवाड यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची पाहणी झाली असून त्यांनीच हे करा, असे सांगितल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
270721\27_2_bed_13_27072021_14.jpg
वनविभाग