अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी आता टोलनाक्यावर पथक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:15 AM2019-07-04T00:15:34+5:302019-07-04T00:16:21+5:30
जिल्ह्यातील वाळू ठेकेदारव वाहतूकदार यांच्यात झालेल्या ‘रेटकार्ड’ वादामुळे प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाया सुरु केल्या आहे, त्याअनुषंगाने अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूलचे एक पथक पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर कायम तैनात ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे.
बीड : जिल्ह्यातील वाळू ठेकेदारव वाहतूकदार यांच्यात झालेल्या ‘रेटकार्ड’ वादामुळे प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाया सुरु केल्या आहे, त्याअनुषंगाने अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूलचे एक पथक पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर कायम तैनात ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे.
गेवराई तालुक्यातील गोदा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात अवैधिरित्या वाळू वाहतूक केली जाते. याला आळा घलण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामध्ये आता औरंगाबाद - सोलापूर - धूळे महामार्गावरील टोल नाक्यावरच महसूल अधिकºयाचे पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डय यांनी दिले आहेत. या पथकांमध्ये एक मंडळ अधिकारी, एक तलाठी आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश असणार आहे. आजपासून ही पथके सक्रिय होणार आहेत.
जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक व चोरी हा विषय राज्यभर गाजला होता. यासंदर्भात विधिमंडळात देखील चर्चा करण्यात आली. वाळू वाहतुक करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे ह्यरेटकार्डह्ण ठेकेदार व वाहतूकदार यांनी निवेदनासोबत दिले होते. त्यामुळे ज्या रस्त्यावरून वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक प्रशासनाने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गावरील पाडळसिंगी येथील टोलनाक्यावरून प्रशासन वाळू वाहतुकीवर नजर ठेवणार आहे. यासाठी टोलनाक्यावर महसूल विभागाची बैठी पथके २४ तास कार्यरत ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे अवैध वाळू वाहतुकीवर निर्बध येणार आहेत.
हे अधिकारी असणार पथकात
टोकनाक्यावर तैनात करण्यात आलेल्या पथकामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी आणि सुरक्षारक्षक यांचा समावेश असणार आहेत. आठ तासांनी अधिकारी बदलणार असून रोज तीन पथके कार्यरत असणार आहेत. विशेष म्हणजे दररोज पथकातील कर्मचारी बदलणार आहेत.
जीपीएस नसलेल्या वाहनांवर देखील कारावाई
टोलनाक्यावरुन वाळू वाहतूक करणाºया गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकेड पावती नसेल किंवा जीपीएस सिस्टम बसवलेले नसेल तरी देखील कारवाई केली जाणार आहे, यावेळी एखादी गाडी नियमबाहाय्य पद्धतीने पकडली तर पोलिस कारवाई केली जाणार आहे.