गेवराईत टिप्परद्वारे वाळू वाहतूकीला प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:37+5:302021-05-23T04:33:37+5:30
गेवराई: मतदारसंघातील गोदावरी व सिंदफणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील रस्त्याची चाळणी झाली ...
गेवराई: मतदारसंघातील गोदावरी व सिंदफणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील रस्त्याची चाळणी झाली होती. मतदारसंघातील गोदावरी व सिंदफना नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा बंद करण्यासाठी सतत प्रयत्न मात्र तोकडे पडले. मतदारसंघातील वाळू घाटाचे टेंडर काढून कायदेशीर वाळु उपसा तसेच ट्रॅक्टरनेच वाळू वाहतूक करावी, या मागणीसाठी आ. लक्ष्मण पवार यांनी तहसील कार्यालय येथे उपोषण केले होते. त्यानंतर पुन्हा १ मार्च रोजी विधान भवनासमोर आ. पवार व नायगावचे आ. राजेश पवार यांनी उपोषण केले होते. त्यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर मतदारसंघात फक्त ट्रॅक्टरनेच वाळू उपसा करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी मतदारसंघातील सर्व वाळू घाटावरून ट्रॅक्टरनेच वाळू वाहतूक करण्याबाबतचे आदेश सर्व ठेकेदारांना काढले आहेत.त्यामुळे आता मतदारसंघात टिप्परने वाळू वाहतुक न करता ट्रॅक्टरनेच वाहतूक होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली आहे.
-------------