शासकीय डेअरीमध्ये दुधाला कवडीमोल भाव - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:46+5:302021-05-28T04:24:46+5:30
सखाराम शिंदे गेवराई : तालुक्यात कोरोना रोगाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिक हैराण झाले. असे असताना परत लाॅकडाऊनमुळे ...
सखाराम शिंदे
गेवराई : तालुक्यात कोरोना रोगाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिक हैराण झाले. असे असताना परत लाॅकडाऊनमुळे अनेकांचे व्यावसाय बंद आहेत. यात तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाच्या वतीने १७ रूपये ते १९ रूपये असा कवडीमोल भाव दिला जात असल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुधाला शासनाने भाववाढ करून द्यावी अशी मागणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील मन्यारवाडी, पांढरवाडी, मानमोडी,कोल्हेर, गोविदंवाडी, वडगाव यासह विविध भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यावसाय करतात. मात्र लाॅकडाऊनमुळे हाॅटेल,भोजनालय, स्वीट होम चहाची हाॅटेला जाणारे दूध बंद झाल्याने हे दूध आता शेतकऱ्यांना येथील दूध डेअरीमध्ये घालावे लागत आहे. मात्र हाॅटेलमध्ये याच दुधाला ४० रूपये ते ५० रूपये प्रति लिटर भाव मिळत होता. मात्र आता शासनाच्या डेअरीमध्ये प्रतिनुसार दुधाला फक्त १७ रूपये लिटर ते १९ रूपये लिटर असा कवडीमोल भाव पडत असल्याने दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. पशुपालनासाठी करावा लागणारा खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी तफावत असल्याने जनावरांचा चाऱ्याचा खर्च सुद्धा निघत नसल्याने दूध धारक शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
हाच भाव गेल्या दोन महिन्यांपूर्वी २५ ते ३० रूपये प्रति लिटर प्रमाणे मिळत होता. मात्र आता दुधाचे भाव एकदम कमी करून तेच दूध आता १७ रूपये लिटर ते १९ रूपये लिटर प्रमाणे विक्री करावे लागत आहे.
तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीला जोड व्यावसाय म्हणून दुधाचा व्यावसाय करतात. तालुक्यात दररोज जवळपास ६ ते ७ हजार लिटर दूध उत्पादन होते. काही शेतकरी घरोघरी जाऊन दूध विकतात तर काही डेअरीमध्ये दूध घालतात.
पाण्याची बाटली २० तर दूध १७ रूपये लिटर
सध्या लाॅकडाऊनमुळे हाॅटेल बंद असल्याने आमचे दूध आम्ही येथील खासगी दूध डेअरीमध्ये १७ ते १९ रूपये लिटर अशा कमी भावाने दूध घालत आहोत. हेच दूध येथील हाॅटेल मालक ४० रूपये ते ५० रूपये लिटरप्रमाणे खरेदी करत होते. त्यामुळे आम्हाला आर्थिक फटका बसत असल्याचे मन्यारवाडी येथील दूध धारक शेतकरी मदन निकम यांनी सांगितले.
दुधाला गेल्या काही दिवसांपासून कमी भाव दिला जात असल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो असून शासनाने आमच्या दुधाला भाव वाढवून द्यावा, अशी मागणी मन्यारवाडीचे दूध विक्रेते अशोक बरगे यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाल्याने आम्हालाही त्याच दराने दूध खरेदी करावे लागत असल्याचे येथील दूध संघाचे कर्मचारी कृष्णा गोलांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
( पांढऱ्या शर्टवाले मदन निकम तर पिवळा,पांढरा शर्ट वाले अशोक बरगे यांचा फोटो आहे. )
===Photopath===
270521\27bed_1_27052021_14.jpg~270521\27bed_2_27052021_14.jpg
===Caption===
अशोक बरगे, मदन निकम~