पालेभाज्यांचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:03 AM2021-02-06T05:03:46+5:302021-02-06T05:03:46+5:30
खड्ड्यांमुळे वाढले अपघात अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. ...
खड्ड्यांमुळे वाढले अपघात
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहेत. तर रस्त्यावरील खड्डे चुकविताना लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आजपर्यंत अनेकांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.
कार्यालयात शुकशुकाट; नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी स्वत:च्या टेबलवर न बसता कार्यालय परिसरातील हॉटेलवरच जास्त प्रमाणात थांबलेले असतात. तर अनेक कर्मचारी बेपत्ता असल्याचे दिसून येत आहे. नागरिक आपल्या कामासाठी विविध शासकीय कार्यालयांत हेलपाटे घालतात. मात्र, त्यांना कर्मचारी भेटत नसल्याने आल्या पावली वापस जाण्याची वेळ येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
----पार्किंग नसल्याने वाहतुकीस अडचण
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका या मुख्य रस्त्यावर पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होतात. या मुख्य रस्त्यावर बँका, रुग्णालय यांची मोठी संख्या आहे. प्रत्येक ग्राहक बँकेत जाताना दुचाकी बाहेर लावतो. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित जगताप यांनी केली आहे.
महिला कारभारी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. एकूण ९९ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच सरपंचपदी विराजमान होणार आहेत. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांकडे जाणार आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी आरक्षण पडल्याने अनेक दिग्गजांना आता आपल्या महिला कारभारणीला पुढे करून राजकारण करावे लागणार आहे.