परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:39 PM2019-03-04T23:39:29+5:302019-03-04T23:40:26+5:30
परळी (जि. बीड ) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. ‘हर ...
परळी (जि. बीड) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात सकाळी दहा वाजेपर्यंत तीन लाख भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविक रविवारी रात्री बारा वाजल्या पासून मंदिरात आले. पहाटेपासून भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या. सकाळी नऊच्या नंतर गर्दीत वाढ झाली. सकाळी दहापर्यंत एक लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले,अशी माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्र ेटरी राजेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. दुष्काळी परिस्थिती, सुटी त्याचबरोबर सोमवारी महाशिवरात्र आल्याने भाविकांची गर्दी लोटली होती.
महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी सायंकाळी बीडचे जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथास ११ आवर्तनांचा रु द्राभिषेक करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. विपिन पाटील, सचिव राजेश देशमुख, प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा.प्रदीप देशमुख, अनिलराव तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ.गुरु प्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, यशवंत पुजारी आदी विश्वस्त उपस्थित होते. अभिषेकासाठी सायंकाळी ७ नंतर भाविकांची गर्दी झाली होती. ५ मार्च रोजी यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत श्रीसुक्त हवन होणार आहे. दुपारी दर्शन मंडपात महाप्रसाद होईल. ६ मार्च रोजी वैद्यनाथाची पालखी वैद्यनाथ मंदिरातून सवाद्य निघेल.