पंचमीनिमित्त महिला सफाई कामगारांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:06+5:302021-08-14T04:39:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : कोरोना महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार, ...

Pride of women cleaners on the occasion of Panchami | पंचमीनिमित्त महिला सफाई कामगारांचा गौरव

पंचमीनिमित्त महिला सफाई कामगारांचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : कोरोना महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार, तर स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांचे मोठे योगदान होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महारथी कर्ण क्रीडा मंडळ व माऊली पानसंबळ यांनी महिला सफाई कामगारांना पंचमीची साडीचोळी व कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला. शिवाय आरोग्य विभागातील कर्मचारी आणि नवोदित क्रीडा प्रेमींना सरावासाठी क्रीडा साहित्याचे वाटप केले.

नगरपंचायतीत दोन दिवसांपूर्वी या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी किशोर सानप, तर प्रमुख उपस्थितीत पद्मश्री शब्बीर, रामदास बडे, भाग्यश्री ढाकणे, भागवत वारे, आदिनाथ गवळी, डॉ. किशोर खाडे, डॉ. प्रदीप आघाव, डॉ. राठोड यांची उपस्थिती होती.

माउली पानसंबळ यांनी सामाजिक बांधीलकीतून महिला सफाई कामगारांना साडीचोळी ही पंचमी व रक्षाबंधनाची अल्पशी भेट देण्याची भूमिका प्रास्ताविकात स्पष्ट केली. फळझाडांची रोपे शेतकऱ्यांना वाटप केली.

यावेळी घोगस पारगांवचे सरपंच देवा गर्कळ, समीर बागवान, शाम महानोर, विष्णू गोल्हार, सचिन सातपुते, सचिन उपळकर, यशराज झिंजुर्डे यांची उपस्थिती होती. गोकुळ पवार यांनी सूत्रसंचालन केले.

130821\img-20210812-wa0022.jpg

फोटो नगरपंचायत महिला सफाई कामगारांना साडी चोळी

Web Title: Pride of women cleaners on the occasion of Panchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.