प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम भरण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:37+5:302021-07-10T04:23:37+5:30
बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ हा बीड जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत ...
बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ हा बीड जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. अधिसूचित पिकांसाठीची विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील पीक उत्पादनातील घट, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आदी बाबीकरिता विम्याचे संरक्षण गरजेचे आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता पीक विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले.
९ जुलै रोजी पीक विमा प्रचार, प्रसिद्धीसाठी बीड जिल्ह्यामध्ये पाच चित्ररथांचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उपसंचालक व भारतीय कृषी विमा कंपनी जिल्हा व्यवस्थापक इनकर, तसेच कृषी विभागातील अधिकारी व पीक विमा कंपनीचे अधिकारी यांच्या सर्वांच्या हस्ते चित्ररथाला फ्लॅग दाखवण्यात आला. हे सर्व चित्ररथ बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रवास करून शेतकऱ्यांमध्ये विमा भरण्यासंदर्भात प्रसार, प्रसिद्धी व जागृतीचे कार्य करणार आहे.
090721\09_2_bed_9_09072021_14.jpeg
कृषी चित्ररथ