प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत २ लाख २८ हजार कुटुंबे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:15 AM2019-02-25T00:15:29+5:302019-02-25T00:16:22+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालात थेट प्रक्षेपण कार्यक्रम झाला.

Prime Minister Kisan Samman Yojana, 2 lakh 28 thousand families are eligible | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत २ लाख २८ हजार कुटुंबे पात्र

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत २ लाख २८ हजार कुटुंबे पात्र

Next
ठळक मुद्देबीड जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण : दहा शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सन्मान

बीड : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालात थेट प्रक्षेपण कार्यक्रम झाला. या योजनेसाठी जिल्ह्यातील जवळपास २ लाख २८ हजार ४३८ अल्पभूधारक शेतकरी कुटुंब पात्र ठरले आहेत. त्यापैकी १ लाख ८३ हजार ९५२ शेतकरी कुटुंबाची माहिती एलआयसी पोर्टलवर अपलोड केली आहे. रविवारी जिल्ह्यातील काही पात्र शेतकºयांच्या खात्यावर प्रायोगिक तत्वावर योजनेचे २ हजार रुपये देखील पाठवण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जि. प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. निकम, आत्माचे प्रकल्प संचालक बी. एम. गायकवाडसह अधिकारी, कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी योजनेची घोषणा झाल्यानंतर महसूल, ग्रामविकास आणि कृषि विभागाने यासाठी एकत्रित काम करुन जिल्ह्यातील ८१ टक्के लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती शासनास सादर केली होती.
सातबारा खातेधारक साडेसहा लाख शेतकºयांपैकी जवळपास अडीच लाख शेतकरी लाभार्थ्यांची माहिती प्राप्त झाली. त्यांना या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेतकरी सखाराम ढोलेंनी व्यक्त केला आनंद
बीड येथील बार्शी नाका परिसरातील अल्पभूधारक शेतकरी नामदेव सखाराम ढोले यांचा प्रातिनिधिक तत्वावर योजनेतील रक्कम मिळण्यासाठी त्यांचा नंबर लागला होता. योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होताच सखाराम ढोले यांच्या मोबाईलवर योजेचे पैसे जमा झाल्याचा संदेश आला. तो संदेश उपस्थितांना दाखवत त्यांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Prime Minister Kisan Samman Yojana, 2 lakh 28 thousand families are eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.