पंतप्रधान कुसुम सौर पंप योजना गावागावात राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:49+5:302021-09-22T04:37:49+5:30
अंबाजोगाई : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान कुसुम सौर पंप ऊर्जा योजना बीड जिल्ह्यातील मोजक्याच गावात सुरू करण्यात आली ...
अंबाजोगाई : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान कुसुम सौर पंप ऊर्जा योजना बीड जिल्ह्यातील मोजक्याच गावात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, ही योजना जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावात सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यात केंद्र सरकारतर्फे सौर पंपासाठी प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना मेडातर्फे सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील खूप कमी गावे आहेत. केज मतदारसंघातील जवळपास फक्त ४५ गावांचीच नावे सदर योजनेत समाविष्ट आहेत. बीड जिल्ह्यात एप्रिल २०१८ पूर्वी भरलेल्या शेतीपंपाची एचव्हीडीएसमध्ये कामे मंजूर आहेत. एप्रिल २०१८ पूर्वीच शेती पंपासाठी कोटेशन भरलेल्यांना एक मोटार एक डीपीचे जवळपास एक हजार शेतकऱ्यांचे काम अद्यापही पेंडिंग आहे. बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे. बीड जिल्ह्यात सिझनमध्ये शेतीपंपास पाच ते सहा तासच विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे सौरपंपाची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आहे. तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंदडा यांनी या निवेदनाद्धारे केली आहे.