बनावट दारू कारखान्यावर छपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:34 AM2021-04-08T04:34:18+5:302021-04-08T04:34:18+5:30

बीड : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागापूरजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारला. या ठिकाणाहून ...

Print on counterfeit liquor factory | बनावट दारू कारखान्यावर छपा

बनावट दारू कारखान्यावर छपा

Next

बीड : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागापूरजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारला. या ठिकाणाहून तब्बल दोन हजार ६०० लिटर स्पिरिट आणि इतर यंत्रसामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागापूरजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारला. त्या ठिकाणी बनावट दारूची वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये बॉटलिंग होत होती. पथकाला त्या ठिकाणी वेगवेगळे लेबलही मिळाले आहेत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट दारूनिर्मिती सुरू असेल याची पथकालाही कल्पना नव्हती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. घटनास्थळावरील साहित्याचे प्रमाण कळल्यानंतर स्वत: अधीक्षक नितीन धार्मिक घटनास्थळी गेले. या ठिकाणाहून पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले आहे तर दोन हजार ६०० लिटर स्पिरिट, बॉटलिंगची मशीन, वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल आणि इतरही साहित्य जप्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी बीडच्या औद्योगिक वसाहतीत पाणी शीतकरणाच्या आड बनावट दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी एक छापा मारला होता. मात्र, त्यावेळी त्या ठिकाणी काहीच आढळून आले नव्हते. हा छापा संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. आज नागापूर जवळ मारलेल्या छाप्यात बीडच्याच त्या छाप्याशी संबंधित काही व्यक्तींचा संबंध असल्याची माहिती हाती येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पिंपळनेर पोलीस अनभिज्ञ कसे

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. याकडे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आले आहे. बनावट दारू तयार करणारा कारखाना चालत असताना पोलिसांना याची माहिती नव्हती का यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Print on counterfeit liquor factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.