प्रीतम मुंडे यांनी केली शेतातील पिकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:43 PM2019-11-03T23:43:24+5:302019-11-03T23:44:10+5:30
बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न ...
बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी, अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधी व शासन शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विमा कंपनीच्या सर्व जाचक अटी व नियमांची कोणतीही काळजी नये. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतक-याच्या खात्यावर शासनाचे अनुदान जमा पोहचेल, असे मत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी खा.मुंडे यांनी केली. बीड तालुक्यातील पेंडगाव, माळापुरी, औरंगपूर, भाटसांगवी, वाकनाथपूर, उंब्रज खालसा, नागपूर, इट, पिंपळनेर, ताडसोन्ना या गावांचा दौरा त्यांनी दौरा केला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, भाजपा युवा राजेंद्र मस्के यांची देखील उपस्थिती होती.
राजेंद्र मस्के यांनी यांनी देखील शेतक-यांशी संवाद साधला. शेतकºयांना धीर देत विमा असो अथवा नसो प्रत्येक शेतकºयांला नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदान मिळवून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. दुष्काळात तीन वर्षांपासून पिचलेल्या शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा खरीप हंगाम गेल्याने नेस्तनाबूत झाला आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला होता परंतु अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कर्जाच्या ओझ्यातही नवी भर पडल्याने शेतकरी शेतमजूर त्रस्त झाला आहे. अशा अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी दिली तर ती नवसंजीवनी ठरेल अशी आशा राजेंद्र मस्के यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा आणि शेतकºयांना अनुदान लवकरात लवकर मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुंडे यांनी बैलगाडीतून केली पाहणी
पिकांची पाहणी करण्यासाठी एका नदीतून बैलगाडीच्या सहाय्याने डॉ.प्रीतम मुंडे यांनी प्रवास केला. व नदी ओलांडून वाकनाथपूर येथील शेतक-यांशी संवाद साधल्याने येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला. तसेच अनेकांनी खा. मुंडे यांच्यापुढे त्यांचे प्रश्न मांडले. यावेळी त्यांनी देखील मोकळेपणाने या सर्व प्रश्नांचे निराकारण केले. तसेच शासनाला परिस्थितीची जाणीव असून सर्वांना नुकसानभरपाई मिळेल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.