पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी प्रीतम मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:06+5:302021-04-17T04:33:06+5:30
परळी : पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना ...
परळी :
पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशा कडक शब्दांत तंबी देत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गुरुवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
याप्रकरणात कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खा. प्रीतम मुंडेंच्या मध्यस्थीने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.
वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसुल करावा, उपसा केलेल्या वाळूचे पंचनामे करावेत आणि तातडीने उपसा थांबवावा, या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम माने, पंडितराव मुठाळ, विष्णू रोडगे, रमेश सहजराव, बळीराम वानखेडे यांनी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. खा.मुंडे यांनी गुरुवारी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. तसेच तेथे उपस्थित असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणावरून चांगलेच फैलावर घेतले. बाहेरील अधिकाऱ्यांची टीम बोलावून अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार शेजूळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते
===Photopath===
150421\4639img-20210415-wa0413_14.jpg