प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा,असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 02:40 PM2023-10-24T14:40:56+5:302023-10-24T14:41:45+5:30

आता आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आता संयम नाही.

Pritam munde will sit at home, you fight, it will not work; Pankaja Munde direct warning to party leadership | प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा,असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा

प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा,असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा

सावरगाव ( बीड): माझ्याकडे फक्त नीतीमत्ता आहे.कोण म्हणते मी या पक्षात चालले, त्या पक्षात चालले. त्रिदेवांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागतले. आता आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू.माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही.आता संयम नाही. मी घरी बसणार नाही, मैदानात उतरणार, असे जाहीर करत पंकजा मुंडे यांनी प्रीतम ताई घरी बसतील तुम्ही लढा, असे चालणार नाही, असा थेट इशारा भाजपा पक्ष नेतृत्वाला दिला.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कायम ठेवली आहे. आज दसरा मेळाव्यास संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी समाजास भावनिक साद घातली. मुंडे म्हणाल्या, माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली.प्रत्येक ठिकाणी माझे जोरदार स्वागत झाले. शेवटचे पद हाती असताना लोकांसाठी अनेक काम केली. मी पराभूत झाले पण कधीच मनाने खचले नाही, तुमची सेवा करण्यात खंड पडला. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, यामुळे तुमची हात जोडून माफी मागते.

महाराष्ट्रात आरक्षणाचे गंभीर प्रश्न, कोणताच समाज अपेक्षाभंग सहन करणार नाही
माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसांत तुम्ही कोट्यावधी रुपये जमा केले. मी एखादी निवडणूक हरले जरी तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही, माझ्याकडे तुम्हाला देण्यास काही नाही, अशी भावनिक साद मुंडे यांनी घातली. तसेच महाराष्ट्रात सध्या गंभीर प्रश्न आहेत, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे. अपेक्षाभंगाचे दु:ख सहन करण्याची सहनशक्ति आता कोणत्याच समाजात नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.शेतकरी सुखी नाही, पिकविमा मिळत नाही, उसतोड मजुरांना पैसा वाढवून द्या,अशा मागण्या देखील मुंडे यांनी केल्या.

Web Title: Pritam munde will sit at home, you fight, it will not work; Pankaja Munde direct warning to party leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.