पृथ्वीराज साठे यांनी घेतला नुकसानीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:37+5:302021-09-13T04:32:37+5:30
.... आष्टीत रक्तदान शिबिराचे आयोजन आष्टी : भारतीय जैन संघटना व शहरातील सर्व गणेश मंडळांच्यावतीने बुधवारी सकाळी १० ते ...
....
आष्टीत रक्तदान शिबिराचे आयोजन
आष्टी : भारतीय जैन संघटना व शहरातील सर्व गणेश मंडळांच्यावतीने बुधवारी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या देशावर कोरोनाचे संकट असून, आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेचेही संकेत दिले आहेत. परिणामी सध्या रक्तपेढीत रक्तसाठाच शिल्लक नाही. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा आष्टीकरांनी रक्तदान करून साजरा करण्याचे ठरविले आहे. बुधवारी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या सदस्यांनी होणाऱ्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहनही अक्षय हळपावत यांनी केले आहे.
....
गौरींचे घरोघरी उत्साहात आगमन
शिरूर कासार : कोरोनाच्या साऱ्या वेदना बाजूला सारत गणपतीनंतर रविवारी गौरींचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. गोरज मुहूर्तावर महालक्ष्मीचे मुखवटे घराच्या अंगणातून देवघरात नेले. यानंतर घरप्रमुख महिलांनी गौरींची स्थापना केली. गौरींपुढे आकर्षक सजावटी केल्या आहेत.
...
परळीच्या महिला महाविद्यालयात पोषण आहार सप्ताह
परळी : शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात गृहविज्ञान विभागाच्यावतीने पोषण सप्ताह ३ ते ९ सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा डॉ. वंदना फटाले यांनी कोविड झाल्यानंतर आहाराचे महत्त्व सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे, प्रा. डॉ. वंदना फटाले उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. रागिणी पाध्ये यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. क्षितीजा देशपांडे यांनी केले.