धारूर घाटात खासगी बस उलटली; १ ठार, ३५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:52 AM2019-05-28T03:52:55+5:302019-05-28T03:53:00+5:30
धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर ते औरंगाबाद जाणारी खासगी बस उलटल्याने बसमधील १ महिला प्रवासी ठार झाली, तर ३५ जण जखमी झाले. यातील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी आहेत.
धारुर : धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर ते औरंगाबाद जाणारी खासगी बस उलटल्याने बसमधील १ महिला प्रवासी ठार झाली, तर ३५ जण जखमी झाले. यातील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी आहेत.
धारूर घाटात २७ मे रोजी रात्री २.३० वाजता उदगीर ते औरंगाबाद जाणारी हमसफर ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच २० डब्ल्यू ९९०६) उलटली. यामध्ये लक्ष्मीबाई मोतीराम नळगीकर (वय ५८) या गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच इतर ५ प्रवासी गंभीर जखमी असून, १४ प्रवाशांना प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई रुग्णालयात हलविण्यात आले. यात समर्थ विद्यासागर कदम, संदीप दिघांबर काळे, गणपत इंद्रजीत राठोड, संतोष रवींद्र कुलकर्णी, दीपा विद्यासागर कदम, प्रणव संतोष कुलकर्णी, वर्षा सतीश कांबळे, सूर्यकांत बाबूराव आणोरे, शाम नामदेव गडदे, ओमप्रकाश बाबुराव कदम, बालाजी त्रिंबक घुले, जयश्री मुरलीधर शिरुरे, मुरलीधर बळवंत शिरुरे, सचिन सुहास काटे, विलास माधवराव पाटील यांचा समावेश आहे. इतर १६ किरकोळ जखमी होते त्यांच्यावर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.