खाजगी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:28 AM2021-01-13T05:28:54+5:302021-01-13T05:28:54+5:30
बसस्थानकासमोरच अवैध प्रवासी वाहतूक बीड : शहरातील प्रमुख बसस्थानकांसमोरच खाजगी वाहनधारक सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसत आहे. ...
बसस्थानकासमोरच अवैध प्रवासी वाहतूक
बीड : शहरातील प्रमुख बसस्थानकांसमोरच खाजगी वाहनधारक सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हे वाहनधारक चक्क बसस्थानकात येऊन प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत. येथील सुरक्षारक्षक व ‘रापम’च्या अधिकाऱ्यांकडून यावर कसलीच कारवाई केली जात नाही.
कर्णकर्कश हॉर्नवर कारवाईची मागणी
माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक वेळा वाहनधारक मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत.
सूचनांकडे होतेय दुर्लक्ष
सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन आवश्यकता नसेल तर परळीला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.
वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध बांधकामाचे साहित्य पडल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. परिणामी लहान मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे. बांधकाम विभागाकडून सांगूनही साहित्य उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.