घरोघरी जाऊन मुलांच्या वाचनातील सोडवल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:06+5:302021-08-27T04:36:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील प्रयास फाउंडेशनने वाचनात अडथळे असणाऱ्या मुलांसाठी घरोघरी जाऊन त्यांच्या वाचनातील समस्या सोडवल्या. या ...

Problems solved in children's reading by going from house to house | घरोघरी जाऊन मुलांच्या वाचनातील सोडवल्या समस्या

घरोघरी जाऊन मुलांच्या वाचनातील सोडवल्या समस्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : येथील प्रयास फाउंडेशनने वाचनात अडथळे असणाऱ्या मुलांसाठी घरोघरी जाऊन त्यांच्या वाचनातील समस्या सोडवल्या. या उपक्रमासाठी प्रयास फाउंडेशनने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (चऱ्हाटा, ता. बीड) येथील विद्यार्थ्यांची निवड केली होती.

इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या जवळजवळ ४० विद्यार्थ्यांची यासाठी चाचणी घेऊन निवड करण्यात आली होती. मुलांना वाचता न येणे ही खूप मोठी समस्या असते. वाचता न आल्यास त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. ते शाळाबाह्य होण्याची शक्यता असते. त्यानुसार मुलांना वाचन साक्षर बनविण्यासाठी गट पद्धतीने सराव, अक्षर ओळख, शब्दवाचन, उतारा वाचन इत्यादी बाबी दोन महिन्यात शिकविण्यात आल्या. ज्ञानेश्वर उबाळे, प्रवीण उबाळे, श्रीकृष्ण उबाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाचन शिकवण्याचे काम केले. नवनाथ सानप यांनी बुद्धिमत्ता याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयास फाउंडेशनला शैक्षणिक साहित्यरूपी मदत एपीआय संदीपान सोनवणे, रवी तांदळे, प्रा. भीमा माने यांनी केली. उपक्रमासाठी सुरेश उबाळे, बाजीराव शिंदे यांनी परिश्रम घेतले.

हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी अभिमान बहीर, केंद्रप्रमुख रावसाहेब तौरे, मुख्याध्यापक अरुण लोमटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू उबाळे, शाळेतील शिक्षक, पालकांनी प्रयास फाउंडेशनचे कौतुक केले.

....

कोरोनाच्या लाटेमध्ये जून ते ऑगस्टदरम्यान प्रयास फाउंडेशनने च-हाटा येथील जि.प.प्रा. शाळेतील वाचनात मागे असणाऱ्या मुलांसाठी घरोघरी जाऊन ‘वाचन विकास उपक्रम’ राबविला. विद्यार्थ्यांना वाचन साक्षर केल्याबद्दल संस्थेच्या सर्व सदस्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

- अभिमान बहिर, शिक्षण विस्तार अधिकारी, राजुरी.

....

कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. चांगल्या कार्यात चऱ्हाटा नेहमीच अग्रेसर असणारे गाव आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रयास फाउंडेशनने मुलांच्या प्रगतीचा स्तर ठरवून गावामध्ये वेगवेगळे गट करून नियमित अभ्यास घेतला. आज त्या मुलांच्या वाचनात चांगली प्रगती झालेली आहे. प्रयास फाउंडेशनचे कार्य अनमोल व दिशादर्शक आहे.

- रावसाहेब तौरे, केंद्रप्रमुख, चऱ्हाटा, ता. बीड.

260821\26_2_bed_2_26082021_14.jpg

प्रयास

Web Title: Problems solved in children's reading by going from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.