विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 07:33 PM2022-01-18T19:33:54+5:302022-01-18T19:34:39+5:30

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचार बंदी लागू असल्याने कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

program organized without permission; Filed a case against MNS district president Sumant Dhasa | विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल

विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

केज ( बीड ) :  पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही सोमवारी तालुक्यातील नांदूरघाट येथे कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याने जमावबंदी आदेश डावलल्या प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दि. १७ जानेवारी रोजी केज तालुक्यातील नांदुरघाट येथे प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी सुमंत धस यांनी दि. १६ जानेवारी रोजी परवानगी मागितली होती. मात्र, जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचार बंदी लागू असल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांना कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारत नोटीसीद्वारे कळविले होते. 

यानंतरही धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून नांदुरघाट येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास हजार ते बाराशे लोकांचा जमाव जमला होता. कोरोना नियमांचा भंग केल्यावरून केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलिस जमादार मेसे यांच्या फिर्यादीवरून मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०/२०२२ भा.दं.वि. १८८, २६९, २७० १७ ५१(ब) गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मेसे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: program organized without permission; Filed a case against MNS district president Sumant Dhasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.