बीडमधील बिंदुसरा नदीवर नवीन पूल उभारणीचे काम प्रगतीपथावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:45 PM2017-12-15T16:45:36+5:302017-12-15T16:48:58+5:30

शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक अजय गाडेकर, प्रबंधक महेश पाटील, आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पुलास भेट देऊन पुलाच्या बांधकामासंदर्भात संदर्भात चर्चा केली.

In progress, a new bridge construction work on Bundsara River in Beed | बीडमधील बिंदुसरा नदीवर नवीन पूल उभारणीचे काम प्रगतीपथावर 

बीडमधील बिंदुसरा नदीवर नवीन पूल उभारणीचे काम प्रगतीपथावर 

googlenewsNext
ठळक मुद्देपरळी - बीड - नगर रस्त्यावर पांगरबावडी, इमामपूर या ठिकाणी भुयारी पूल व रस्ता करण्याचा निर्णय झाला आहे. बिंदूसरा नदीवरील ८० वर्षांपूर्वीचा पूल त्याच ठिकाणी १६२ मीटर लांबीचा नवीन पूल करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्येच दाखल केला होता.

- सतीश जोशी

बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक अजय गाडेकर, प्रबंधक महेश पाटील, आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पुलास भेट देऊन पुलाच्या बांधकामासंदर्भात संदर्भात चर्चा केली.

गुरुवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एस.चंद्रशेखर, आय.आर.बी.चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिका-यांची तातडीने नागपूर येथे बैठक घेतली. आय.आर.बी. करत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग २११ च्या कामांतर्गत स्कोप आॅफ चेंज वर्क या हेडखाली हे काम होणार आहे. अस्तित्वात असलेला पूल पाडण्याचे काम १५ ते २० दिवसात करुन पावसाळयापूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आ. क्षीरसागरांनी दिल्यामुळे या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वरील बीड बायपास १२ किलोमीटरला सर्व्हिस व स्लीप रोड करुन परळी - बीड - नगर रस्त्यावर पांगरबावडी, इमामपूर या ठिकाणी भुयारी पूल व रस्ता करण्याचा निर्णय झाला आहे. कुर्ला रोडवरील नागरिकांसाठी सर्व्हिस व स्लीपरोड करण्याची सूचनाही आ. क्षीरसागर यांनी प्रकल्प संचालकांना दिली होती. त्याच वेळी बार्शी नाका येथील बिंदूसरा नदीवरील ८० वर्षांपूर्वीचा पूल त्याच ठिकाणी १६२ मीटर लांबीचा नवीन पूल करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्येच दाखल केला होता. 

केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा पूल स्कोप आॅफ चेंज वर्क या नियमानुसार नवीन टेंडर न काढता कमी कालावधीत करता येतो हे आ. क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर गडकरी यांनी पुलाच्या बांधकामाबाबत सूचना देऊन तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते.

 

Web Title: In progress, a new bridge construction work on Bundsara River in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड