विकासाची आश्वासने, विरोधकांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:19 AM2018-12-26T00:19:00+5:302018-12-26T00:19:29+5:30

आ. सुरेश धस हे राजकारणातील ‘माऊली’ असल्याचे संबोधन देत आता ते तीन जिल्ह्यांत राजकीय कीर्तन करतात. राजकारणात काम करणारे ते भूतच आहे, अशा शब्दात बीडचे राष्टÑवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी धसांची प्रशंसा करून आपल्या राजकीय मैत्रींची साक्ष दिली.

Promises of development, criticism of opponents | विकासाची आश्वासने, विरोधकांवर टीका

विकासाची आश्वासने, विरोधकांवर टीका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : आ. सुरेश धस हे राजकारणातील ‘माऊली’ असल्याचे संबोधन देत आता ते तीन जिल्ह्यांत राजकीय कीर्तन करतात. राजकारणात काम करणारे ते भूतच आहे, अशा शब्दात बीडचे राष्टÑवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी धसांची प्रशंसा करून आपल्या राजकीय मैत्रींची साक्ष दिली.
शिरूर नगर पंचायतमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी नगर पंचायतच्या पटांगणात संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यात शहराच्या विकासाबाबत शब्दांचा पाऊस पडला, त्याचबरोबर विरोधकावरही सडकून टीकेची गारपीटच झाली. सोहळ्यादरम्यान भारतभूषण क्षीरसागर यांनी संथ, पण दमदार भाषणातून नगर पंचायतला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षस्थानी न. पं.च्या प्रथम महिला अध्यक्ष मीराताई गाडेकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. सुरेश धस, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, वडवणीचे राजाभाऊ मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य शिवाजी पवार, माऊली जरांगे, प्रकाश कवठेकर, रामहरी महानोर, डॉ. मधुसूदन खेडकर, विलास विधाते, शेख सादीक, विनोद मुळूक, गणेश वाघमारे,आश्रूबा खरमाटे, निवृत्ती बेदरे, अ‍ॅड. प्रकाश बडे, अशोक सव्वासे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रावसाहेब पाटील आदी होते.
प्रास्ताविक भाषणात प्रकाश देसरडा यांनी भूमिका मांडली. त्यानंतर अश्विनी भांडेकर, वर्षा सानप, आशा शिंदे या महिला नगरसेविकांसह संदीप पाटील, सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजाभाऊ मुंडे यांनी वडवणीच्या विकासाचे गमक सांगितले. क्षीरसागर यांनी शिरूर न.पं.ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगून बीडचा अनुभवी कर्मचारी वर्ग गरजेनुसार देण्यात येईल. विकास कामाची घाई करू नका, त्यात चुका होतात याचा अनुभव मला आल्याचे सांगितले. सर्वंकष आराखडा तयार करा व टप्प्याने काम करा, असे सांगून आदर्श नगर पंचायत होण्यासाठी सहकार्य करू. उद्यान, क्रीडांगण, व्यापारपेठेचे पुनरुज्जीवन आदींबाबत माहिती देत शिरूरला दोन आण्णा असल्याने काही उणीव भासणार नाही. आ. धस यांच्याबाबत ठेवलेली सद्भावना कारणी लागली असल्याचे सांगून वारसा आणि वसा सांभाळत सहकार्य करण्याची स्व. काकू व स्व. मुंडे यांची परंपरा आम्ही पक्षविरहित सांभाळत असल्याचे सांगितले. त्यानंतर आ. धस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन फय्याज शेख यांनी केले, तर आभार दत्ता पाटील यांनी मानले. यावेळी शिरूरसह पंचक्रोशीतून लोकांनी गर्दी केली होती.
राजकीय उलथापालथ : न.पं.मध्ये सत्तांतर
सुरूवातीपासूनच शिरूर नगर पंचायत ही राष्ट्रवादीच्या म्हणजेच धस यांच्या ताब्यात होती. मात्र, त्यांच्या पक्षबदलीनंतर बऱ्याच उलथापालथी होऊन न्यायालयाच्या लढ्यात अखेर न.पं.मधे सत्तांतर घडून आले.
धस यांचे समर्थक मीराताई गाडेकर (पाटील ) अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रकाश देसरडा यांची निवड करून रितसर बारा डिसेंबरला पदभार बहाल करण्यात आला.
नवनिर्वाचित पदाधिका-यांनी आलेली मरगळ झटकून कामाला प्राधान्य दिले. काम सुरू केल्यानंतरच सत्काराला येईल, असा शब्द सुरेश धस यांनी दिला होता. त्याप्रमाणे रविवारी हा सोहळा आयोजित केला होता.

Web Title: Promises of development, criticism of opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.