निरीक्षकपदी प्रमोशन मिळाले अन् २४ तासांत निवृत्तही झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:42 AM2018-08-01T00:42:13+5:302018-08-01T00:45:23+5:30

Promotions were found in the post of observer and retired in 24 hours | निरीक्षकपदी प्रमोशन मिळाले अन् २४ तासांत निवृत्तही झाले

निरीक्षकपदी प्रमोशन मिळाले अन् २४ तासांत निवृत्तही झाले

Next
ठळक मुद्दे३६ वर्षे पोलीस खात्यात काम करून रमेश गायकवाड निवृत्त

बीड : ३६ वर्षे पोलीस प्रशासनात नौकरी केली. याची पावती म्हणून प्रशासनाने त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ते लगेच निवृत्तही झाले. केवळ एका दिवसासाठी ते एपीआय चे पीआय बनले. अशा घटना क्वचितच घडतात. एकच दिवस त्यांना वर्ग १ चा अधिकारी म्हणून काम करता आले. असे असले तरी आपली शेवटच्या दिवशी का होईना, पोलीस निरीक्षक होण्याची इच्छा पूर्ण झाली, अशी भावना पेठबीड पोलीस ठाण्यातील मंगळवारी निवृत्त झालेले पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले होते.

रमेश मारोतीराव गायकवाडे हे मुळचे औरंगाबादचे रहिवाशी. १९८२ साली ते पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हूणन औरंगाबादला रूजू झाले. त्यानंतर २००० साली खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि २००१ साली ते पोलीस उपनिरीक्षक झाले. २०११ पुन्हा त्यांची सहायक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली. मागील साडे तीन वर्षांपासून गायकवाड हे पेठबीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

गायकवाड यांना वर्षापूर्वीच पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासन विभागातील गलथान कारभारामुळे त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे गायकवाड थेट पोलीस महासंचालकांना भेटले. त्यांनी पदोन्नतीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. पुन्हा प्रस्ताव पाठविला परंतु न्यायालयाच्या आदेशाने सर्वच पदोन्नत्या रोखण्यात आल्या. पुन्हा प्रस्ताव पाठविला आणि ३० जुलै रोजी त्यांचे प्रमोशन झाल्याचा फॅक्स अधीक्षकांना आला.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तात्काळ त्यांना बोलावून घेत प्रमोशन दिले. खांद्यावर तिसरा स्टार आणि रिबीन चढताच पेठबीड पोलीस ठाण्यात आनंदोत्सव करण्यात आला. एकीकडे आंनदोत्सव होत असला तरी गायकवाड यांच्या मनात मात्र ‘कही खुशी कही गम’ अशी भावना होती. केवळ निवृत्तीच्या आगोदर २४ तासाने प्रमोशन झाले. त्यामुळे काम करण्याची सर्व स्वप्ने अधुरे राहिले. तर दुसऱ्या बाजुला शेवटच्या दिवशी का होईना आपण वर्ग १ चा अधिकारी झालोत, याचा आनंद होता. उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि बी.एस.बडे यांच्या उपस्थितीत त्यांना मंगळवारी निरोप देण्यात आला.

प्रामाणिक कर्तव्य बजावले
पोलीस दलात रूजू झाल्यापासून ते निवृत्ती पर्यंत प्रामाणिक कर्तव्य बजावले. खाकी बदनाम होणार नाही, यासाठी प्रयत्न केले. वर्षापुर्वीच प्रमोशन झाले नसले तरी शेवटच्या दिवशी का होईना मी पोलीस निरीक्षक झाल्याचा मला आनंद असल्याचे निरीक्षक रमेश गायकवाड म्हणाले.

गायकवाडसाठी त्यांचे मन ‘बडे’
पेठबीड ठाण्याचे प्रमुख बी.एस.बडे यांनी आपले मोठे मन करीत गायकवाड यांना एका दिवसासाठी प्रभारी अधिकारी बनविले. काही तासांसाठी का होईना परंतु एकाच ठाण्यात दोन पोलीस निरीक्षक पाहण्याचा अनुभव कर्मचाºयांना आला.

Web Title: Promotions were found in the post of observer and retired in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.