महाराष्ट्र हादरलं ! अल्पवयीन पीडितेवर ४०० जणांसह एक नव्हे तर दोन पोलिसांनी केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 01:16 PM2021-11-15T13:16:20+5:302021-11-15T13:23:58+5:30

Minor Girl Gang Raped By 400 People: सासरी छळ झाल्याने ती माहेरी आली. तेथे जन्मदात्या वडिलानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.

The protector became the eater; The minor victim was raped by not one but two policemen including 400 people | महाराष्ट्र हादरलं ! अल्पवयीन पीडितेवर ४०० जणांसह एक नव्हे तर दोन पोलिसांनी केला अत्याचार

महाराष्ट्र हादरलं ! अल्पवयीन पीडितेवर ४०० जणांसह एक नव्हे तर दोन पोलिसांनी केला अत्याचार

Next

बीड: अंबाजोगाई तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात एक नव्हे तर दोन पोलिसांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित मुलीने पुरवणी जवाबात त्यांचा उल्लेख केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. दरम्यान, रक्षकच भक्षक बनल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी पिडीतेने तब्बल ४०० जणांनी तिच्यावर विविध ठिकाणी अत्याचार केल्याचा जवाब दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. ((Minor Girl Gang Raped By 400 People )

अल्पवयीन पीडिता अवघ्या ९ वर्षांची असताना आईचे निधन झाले. त्यामुळे चुलत्याने १३ व्या वर्षीच तिचा विवाह उरकला. मात्र, सासरी छळ झाल्याने ती माहेरी आली. तेथे जन्मदात्या वडिलानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यामुळे अंबाजोगाईत भीक मागत भटकणाऱ्या या मुलीसोबत सहा महिन्यांत अनेकांनी कूकर्म केले. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी तिच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. ११ रोजी पीडितेला बाल कल्याण समितीपुढे हजर केले होते. 

यावेळी तिने धक्कादायक खुलासा करत सहा महिन्यांत चारशे जणांनी अत्याचार केल्याचा दावा केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी तपास अंबाजोगाईच्या अपर अधीक्षक कविता नेरकरांकडे सोपविला. या प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही, पोलीस दोषी असतील तर निश्चितपणे कारवाई होईल, असा इशारा अधीक्षक आर. राजा यांनी दिला आहे.

एकाने केला अतिप्रसंग, दुसऱ्याने घरी नेऊन अत्याचार
दम्यान, बालकल्याण समितीपुढे केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी बीडमध्ये अल्पमुदती निवासीगृहात पीडितेचा पुरवणी जवाब नोंदविला. समुपदेशक मनीषा ताेकले यांच्यासमोर नोंदविलेल्या पुरवणी जवाबात पीडितेने अत्याचार करणाऱ्या काही लोकांची नावे तर काहींचे वर्णन व घटनास्थळाची सविस्तर माहिती दिली. यात तिने दोन पोलिसांचाही उल्लेख केला आहे. त्यापैकी एकाने हॉटेलवर नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिला स्वत:च्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक दावा तिने केला.

Web Title: The protector became the eater; The minor victim was raped by not one but two policemen including 400 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.