आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, आंदोलकांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 12:37 PM2023-09-09T12:37:09+5:302023-09-09T12:37:33+5:30
मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा
दिंद्रुड (बीड) : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध करत त्यांच्या समर्थनार्थ दिंद्रुड येथे मागील ३ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. या आंदोलकांनी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मतदान न करण्याची शपथ घेतली आहे.
आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, बीड जिल्ह्यातील दिंद्रुड येथील आंदोलकांनी घेतली शपथ #marathareservationprotestpic.twitter.com/qAfuicSlCx
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 9, 2023
आज सकाळी उपोषणकर्त्यांची दिंद्रुड व पंचक्रोशीतील मुस्लिम समाजाने भेट घेत आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा दर्शवला. मराठा समाजाला 16 टक्के व मुस्लिम समाजाला पाच ते सहा टक्के आरक्षण देण्यात यावं अशी मागणी समाजाची असल्याचे मौलाना फारुख यांनी याप्रसंगी नमूद केले. दरम्यान, मराठा समाजाचा आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार राहील, अशी शपथ ज्येष्ठ विचारवंत सुशेन महाराज नाईकवाडे यांनी आंदोलकांना दिली. जालना जिल्ह्यात सुरू झालेले मराठा आरक्षण आंदोलनास ग्रामीण भागातून पाठिंबा वाढत असल्याचे दृश्य आहे.