न्यायासह सामान्यांना सेवा मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:55 PM2018-10-07T23:55:50+5:302018-10-07T23:56:29+5:30
शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांना माहीत होण्यासाठी अशा महाशिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध घटकांना एका छताखाली आणून त्यांच्यामार्फत शासनाच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. न्यायासोबतच सामान्यांना त्यांचे अधिकार आणि त्यांना सेवा मिळावी यासाठी अशा महाशिबिरांची संकल्पना विधि सेवा प्राधिकरणची असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष ए.एस. ओक यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांना माहीत होण्यासाठी अशा महाशिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध घटकांना एका छताखाली आणून त्यांच्यामार्फत शासनाच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. न्यायासोबतच सामान्यांना त्यांचे अधिकार आणि त्यांना सेवा मिळावी यासाठी अशा महाशिबिरांची संकल्पना विधि सेवा प्राधिकरणची असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष ए.एस. ओक यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधिसेवा प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे आयोजित महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. एस.एम. गव्हाणे, प्रमुख जिल्हा सत्र न्या. प्राची कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, विभागीय सहआयुक्त महेंद्र हरपाळकर, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई कार्यासन अधिकारी संजय यादव, जि. प. चे सीईओ अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश गंडले, जिल्हा सरकारी वकील अजय राख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव आदेश डी.एन. खडसे, अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, कृषी अधीक्षक एम.एल.चपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.
५० विभागांचे ६० स्टॉल
महाशिबिरामध्ये ५० विभागाचे ६० स्टॉल उभारले होेते. यावेळी नागरिक, गर्भवती महिला, वृद्धांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली.
तसेच पशुसंवर्धन विभागाकडून जवळपास ५०० जनावरांची तपासणी करण्यात आली.
बीएसएनएलच्या माध्यमातून नागरिकांना योजनेचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला. तसेच समाजकल्याणच्या विविध योजना, महावितरण, कृषी विभाग, रेशन कार्ड, मतदानकार्ड, आधार कार्ड, माती परीक्षणासह इतर विभागांच्या योजनांचा लाभ यावेळी नागरिकांना देण्यात आला.
लाभ देण्यासाठी नावनोंदणी
साक्षाळपिंप्री येथील शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ज्या इच्छुकाला लाभ देता आला नाही त्याची नोंदणी करण्यात आली असून येत्या काही दिवसांत लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
.....
तीन महिन्यांपासून नियोजन
मागील तीन महिन्यांपासून या शिबिराचे नियोजन करण्यात आले. असून सर्व विभागांच्या अधिकाºयांच्या बैठक घेतल्या. प्रत्येक विभागाच्या अधिकाºयांनी वेळोवेळी योग्य कल्पना सुचवल्यामुळे साक्षाळपिंप्री येथील महाशिबीर यशस्वी झाले आहे.
- एम. डी. सिंह, जिल्हाधिकारी