ज्ञानप्रबोधिनीतर्फे स्वारातीला ऑक्सिजन सयंत्र प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:47+5:302021-06-05T04:24:47+5:30

आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज व गतिमान करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीने घेतलेला पुढाकार ...

Providing oxygen plant to Swarati by Gyanprabodhini | ज्ञानप्रबोधिनीतर्फे स्वारातीला ऑक्सिजन सयंत्र प्रदान

ज्ञानप्रबोधिनीतर्फे स्वारातीला ऑक्सिजन सयंत्र प्रदान

Next

आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज व गतिमान करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीने घेतलेला पुढाकार रुग्णांना दिलासादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केले.

येथील ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड सेंटरला व्हेंटिलेटरसाठीचे ऑक्सिजनचे तीन सयंत्र (बायपॅप) अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नंदकिशोर मुंदडा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर, कोविड कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राजेश कचरे, डॉ. नितीन चाटे, डॉ. राकेश जाधव, डॉ. विशाल लेडे, डॉ. स्नेहाली शिंदे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. अतुल देशपांडे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक प्रसाद चिक्षे यांची उपस्थिती होती.

येथील कोविड सेंटरमधील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीतर्फे ही मदत करण्यात आली. याकामी ज्ञानप्रबोधिनी फाऊंडेशन, अमेरिकेने यासाठी भरीव

मदत केली आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध व्हावी. रुग्णसेवेतील अडथळे दूर व्हावेत. यासाठी ज्ञानप्रबोधिनीने पुढाकार घेतल्याचे चिक्षे म्हणाले. डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. संदीप निळेकर, डॉ. नितीन चाटे, डॉ. राकेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे चिक्षे, सदानंद वालेकर, अभिजित जोंधळे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. अनिल मस्के, डॉ. विश्वजित पवार, डॉ. नागेश अब्दागिरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संकल्पाची पूर्तता

कोरोना योद्धा डॉ. विशाल लेडे व डॉ. स्नेहाली लेडे यांच्या हस्ते या सयंत्रांचे लोकार्पण कोविड कक्षास करण्यात आले.

ज्ञानप्रबोधिनीतर्फे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला एकूण २० लाख ७२ हजार रुपयांची आरोग्य उपकरणे ज्ञानप्रबोधिनीतर्फे प्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पाची पूर्तता झाली असल्याचे प्रसाद चिक्षे यांनी सांगितले.

===Photopath===

040621\20210604_133212_14.jpg

Web Title: Providing oxygen plant to Swarati by Gyanprabodhini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.