ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास अन् पर्यावरण रक्षणासाठी केली जाणार जनजागृती - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:49+5:302021-01-24T04:15:49+5:30
यासंदर्भात माहिती देण्यासाठी इंडियन ऑईलचे विश्वजित कुमार, भारत पेट्रोलियमचे अमूल्य भुरिया, हिंदुस्तान पेट्रोलियमचे प्रसाद सावजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद ...
यासंदर्भात माहिती देण्यासाठी इंडियन ऑईलचे विश्वजित कुमार, भारत पेट्रोलियमचे अमूल्य भुरिया, हिंदुस्तान पेट्रोलियमचे प्रसाद सावजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. महोत्सवासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, संरक्षण क्षमता महोत्सव हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जो आपल्या देशाच्या ऊर्जासुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्यासंंबंधी राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने आणि पाठिंब्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
संपूर्ण देशभरात हरित आणि स्वच्छ ऊर्जा या घोषवाक्यांद्वारे १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव)चे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धन, पेट्रोल पंप, गॅस एजन्सीज, तांत्रिक बैठक कार्यशाळेद्वारे संवर्धनावरील मोहीम, गृहिणींसाठी गटचर्चा, क्लब, संस्था, स्वयंसेवी संस्था, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, टी.व्ही., रेडिओवरील चर्चा कार्यक्रम आदी सुमारे २४ विविध उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.