धारूरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:19 PM2017-11-20T23:19:18+5:302017-11-20T23:19:23+5:30
धारूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी रविवारी रात्रीपासून धुमाकुळ घातला आहे. तब्बल २० जणांना चावा घेतल्याने सर्वत्र या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धारूर : शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी रविवारी रात्रीपासून धुमाकुळ घातला आहे. तब्बल २० जणांना चावा घेतल्याने सर्वत्र या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कुत्र्याने चावा घेतल्यानंतरही बालाजी नाईकवाडे या विद्यार्थ्याने त्याचा पाठलाग करून शिताफीने ठार मारले. धारूर शहरात रविवारी रात्रीपासून पिसाळलेल्या एका कुत्र्याने धुमाकूळ घातला. शहरातील दुधाळा, गायकवाड गल्ली, कसबा, धनगरवाडा या भागात सुमारे २० जणांना या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये शाळकरी मुले, मुलींचा समावेश आहे. राम लोखंडे, समीर शेख, जयदीप बेरे, बळीराम राउत, शिवराज औताडे, मुक्ताराम वाणी, अब्दुल कुरेशी, कल्पणा बारस्कर, उस्मान शेख, हर्षा माने, सचिन सिरसळ, आयान शेख, बालाजी नाईकवाडे यांचा जखमीत समावेश आहे.
शहरात धुमाकूळ घातल्यावर हा कुत्रा धनगरवाड्याजवळील डोंगर वेशीजवळ आला. त्याठिकानी बालाजी भिमराव नाईकवाडे या विद्यार्थ्याच्या हाताला चावा घेतला. स्वत:ची सुटका करून घेण्याबरोबरच जवळील लोखंडी रॉडने त्याने कुत्र्यावर हल्ला करीत त्याला ठार केले.
दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यांच्या बंदोबस्तसाठी नगर पालिका आखडता हात घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पालिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.