पंचनामे सुरू पण पावसाचा व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:36+5:302021-09-09T04:40:36+5:30

शिरूर कासार : तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने कहर केला. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Punchnama started but rain interrupted | पंचनामे सुरू पण पावसाचा व्यत्यय

पंचनामे सुरू पण पावसाचा व्यत्यय

Next

शिरूर कासार : तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने कहर केला. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घराची पडझड आणि शेत वाहून जाण्याच्या ही घटना घडल्या आहेत. जनावरेही मृत्युमुखी पडले आहेत. नद्यानाल्यांना पाण्याचा जोर कायम आहे. तालुक्यात ५० हजार हेक्टरला बाधा पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून पंचनामे सुरू झाले असून या कामातही मोठा व्यत्यय येत असल्याचे सांगण्यात आले. उडीद, तूर, कापूस, बाजरीसह सुमारे ४८,९७७ हेक्टरवर पेरा आहे. हे सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे.

...

पावसाची आकडेवारी (मिमी.मध्ये)

पावसाची सरासरी ५९९.४

आजपर्यंत झालेला पाऊस ६६५

...

शेतही गेले अन् पीक ही गेले

अतिपावसामुळे शेताच्या जवळ असलेल्या ओढ्याचे पाणी अंबादास बडे, पांडुरंग बडे यांच्यासह शेजारीच असलेल्या शेतात घुसले. मुगासह सोयाबीन वाहून गेले. शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी कृष्णा बडे यांनी सांगितले. तर पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

...

पंचनामे सुरू

गेल्या दोन दिवसांपासून पंचनामे काम सुरू आहे. पावसामुळे शेतात पोहोचण्यात मोठा व्यत्यय येत आहे. तरीही सर्वंकष पंचनामे करून नुकसानीचा अहवाल पाठविण्याची कारवाई होणार असल्याचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी सांगितले.

080921\img-20210906-wa0025.jpg

फोटो

Web Title: Punchnama started but rain interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.