विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:58+5:302021-04-19T04:30:58+5:30

दिंद्रुड : शनिवारी वीकेंड लाॅकडाऊन दरम्यान दिंद्रुड व तेलगाव येथे दुचाकीवर विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी ...

Punitive action against those who walk around without any reason | विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next

दिंद्रुड : शनिवारी वीकेंड लाॅकडाऊन दरम्यान दिंद्रुड व तेलगाव येथे दुचाकीवर विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दिंद्रुडला दोन दिवसात ५ हजार तर तेलगाव येथे २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधात शनिवार, रविवार वीकेंड लाॅकडाऊन जाहीर करून या दोन दिवशी दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. वीकेंड लाॅकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा विनाकारण बाहेर येऊ नये. असे सक्त आदेश दिलेले असताना विनाकारण लोक बाहेर फिरतात. विकेंड लाॅकडाऊनदरम्यान तेलगाव येथील चौक व दिंद्रुड येथे शनिवारी काही दुचाकी चालक विनाकारण व विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांच्याकडून विनामास्क, वाहनाची कागदपत्रे नसणे आदी विविध कारवाया करून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रभारी सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत पो.काॅ. बदने, वाहतूक पोलीस गायकवाड, पो.काॅ. मुजमुले, होमगार्ड राठोड आदींसह पोलीस कर्मचारी सहभागी होते.

===Photopath===

180421\sanotsh swami_img-20210418-wa0085_14.jpg

Web Title: Punitive action against those who walk around without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.