विनापरवाना खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:08+5:302021-09-02T05:13:08+5:30
बीड: विहित वेळेव्यतिरिक्त खडी क्रशर चालविल्यास परवाना रद्दसह दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी धारुरच्या तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी ...
बीड: विहित वेळेव्यतिरिक्त खडी क्रशर चालविल्यास परवाना रद्दसह दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी धारुरच्या तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी दिली. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी तक्रार केली होती.
धारुर तालुक्यात परवानाधारक सात खडी क्रशर आहेत. यातील काही खडी क्रशर व वाहतूक रात्री -अपरात्री सुरु असते. त्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागतो.काहींनी रॉयल्टी भरलेली नाही तर काही जणांकडे परवानाही नाही, अशी तक्रार डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याकडे १३ ऑगस्ट रोजी केली होती. याची दखल घेत तहसीलदारांनी ३१ ऑगस्ट रोजी परवानाधारक सात खडी क्रशर मालकांना पत्र धाडून नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोर जा असा इशारा दिला आहे. खडी क्रशर विनापरवाना सुरु असेल तर सील केले जाईल तसेच नियमांचे उल्लंघन होत असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी क्रशरचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
...
फौजदारी कारवाई का नाही
आरणवाडी तलावाजवळील बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन करण्यात आले होते. यात केलेल्या दंडाची रक्कम अजूनही कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकीत आहे. केवळ नोटीस बजावून कारवाईचा सोपस्कार केला जात आहे. फौजदारी कारवाई कधी, असा प्रश्न डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी उपस्थित केला.
...