पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांची बियाणे खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:26 AM2019-06-11T00:26:05+5:302019-06-11T00:26:32+5:30
जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे.
बीड : जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या अंदाज घेऊन शेतकरी बियाणांची खरेदी करत आहेत.
खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा केला जातो. दरवर्षी ७ ते १५ जूनर्पंयत पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणी करतात. मात्र, मागील दोन वर्षात पावसाचे घटलेले प्रमाण व न येणा-या अंदाजामुळे हंगामा पुर्वीची १५ ते २० दिवस आधी जी बीयाणांची व खतांची खरेदी केली जात होती. ती करण्याचे धाडस शेतकऱ्यांमधून केले जात नाही. दरवर्षी पावसाचा अंदाज घेऊन ‘मे’ महिन्याच्या शेवटी शेतकरी बियाणे व खतांची खरेदी करत असतात. मात्र,आजपर्यंत ५ टक्के शेतक-यांनी देखील खरेदी केलेली नाही. विविध पिकांचे बियाणे व खतांची मागणीप्रमाणे आवक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे तुटवडा जाणवणार नाही. मात्र, लागवडीपुर्वी जी खरेदी केली जात होती ती करण्याचे धाडस शेतकरी करत नसल्यामुळे बीयणे व खतांच्या बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाही. मात्र, यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे बाजारामधील उलाढाल वाढेल अशी आशा बीड मोढा भागातील कृषी सेवा कंद्र चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.