नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:55 PM2019-10-30T23:55:01+5:302019-10-30T23:55:27+5:30
बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची ...
बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी ७२ तासाच्या आत विहित नमुन्यासह अर्ज तालुका कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी व तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकºयांनी रांगा लावल्या आहेत. तसेच कृषी कार्यालयाकडून देखील शेतकºयांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली होती. दरम्यान त्यानंतर थोड्या-थोड्या पावसावर पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र, सोयबीन, बाजरी हे पिक काढणीला आलेले असताना व कापूस देखील फुटत होता. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला त्यामुळे काढणी झालेल्या बाजरी पिकाचे तसेच सोयबीन व उभ्या कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेल्या उभ्या पिकात पाणी साठून राहिल्यामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतक-यांमधून केली जात होती.
त्यानुसार संबंधित शेतकºयांनी विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाले असेल किंवा काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार शेतकºयांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यासह तालुका कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी शेतकºयांना हा अर्ज भरण्यासाठी व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक नावालाच
नुकसानग्रस्त शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. यावर नुकसान झाल्यापासून ४८ तासाच्या आत माहिती विमा कंपनीला देण्याचे गरजेचे आहे.
तक्रारीसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवरती प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच हा हेल्पलाईन क्रमाक हा सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असल्याचे देखील सांगितले जाते, त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ होत आहे.