लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:52+5:302021-05-08T04:35:52+5:30

अंभोरा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिक मध्यरात्रीपासून रांगा लावत ...

Queues from midnight for vaccinations | लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून रांगा

लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून रांगा

Next

अंभोरा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिक मध्यरात्रीपासून रांगा लावत आहेत. या केंद्रांतर्गत अंभोरा, उंदरखेल, गहूखेल, हिवरा पिंपरखेड, मराठवाडी, भोजेवाडीसह ४३ गावे येतात. मागील काही दिवसांपासून लसीकरणासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने पुन्हा लस मिळेल की नाही या मानसिकतेतून ग्रामीण भागातून पुरुष, महिला, युवक आदल्या दिवशी रात्रीपासून सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहेत. सकाळी ९ वाजता लसीकरणाला सुरुवात होते. एक - दोन तास अगोदर आले तरी चालते. मध्यरात्री, पहाटे येऊ नका, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगितल्यानंतरही लोक ऐकत नसून लसीकरणासाठी रात्र रात्र जागून काढत आहेत. शुक्रवारी येथे कोविड प्रतिबंधकचा दुसरा डोस व पहिला डोस देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या आरोग्य केंद्राला ६०० लसी प्राप्त झाल्या होत्या. दिवसभरात हे सर्व लसीकरण झाले. आतापर्यंत जवळपास आठ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पुरवठा होताच पुन्हा लसीकरण होईल, असे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

फोटो ओळी : शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रांगेत बसलेले तर काही जण विश्रांती करीत असतानाचे छायाचित्र.

===Photopath===

070521\img-20210507-wa0152_14.jpg~070521\07bed_14_07052021_14.jpg

===Caption===

लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून रांगा

Web Title: Queues from midnight for vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.