आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:46+5:302021-02-14T04:31:46+5:30
बीड : जिल्ह्यात २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेचा निकाल जाहीर झाला असून, ...
बीड : जिल्ह्यात २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेचा निकाल जाहीर झाला असून, जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान धारूर तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतीने पटकावला आहे.
जिल्ह्यातील ११ पंचायत समितीअंतर्गत १०३१ ग्रामपंचायतींपैकी अधिक गुण प्राप्त जळलपास २६५ ग्रामपंचायतींची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत क्रॉस चेकिंग करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतींचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या तालुकास्तरीय समितीकडून गुणांकन व मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी, अभिलेख्यांची व गुणांची पडताळणी करून ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आले होते. तालुकास्तरावर अकरा ग्रामपंचायती पात्र ठरल्या.
तालुकास्तरावर पात्र ठरलेल्या ग्रामपंचायती (कंसात मिळालेले गुण )
अंबाजोगाई -गिरवली -६३
आष्टी - सराटे वडगाव -७१
बीड - ताडसोन्ना -७१
धारूर -आवरगाव -८४
गेवराई - किनगाव -५३
केज - केवड -५१
माजलगाव - शेलापुरी -६१
परळी - तपोवन -५२
पाटोदा - रोहतवाडी -६४
शिरूरकासार - खोकरमोहा -५७
वडवणी - बाहेगव्हाण -५३
या अकरा तालुक्यांतील ग्रामपंचायतींमधून धारूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायतीला गुण ८४ मिळाल्याने जिल्हा पातळीवर ही ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी हा निकाल जाहीर केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी यांनी सांगितले. या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी सन्मानित करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.