झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 08:01 PM2023-07-29T20:01:39+5:302023-07-29T20:01:57+5:30
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
धारूर : तालुक्यातील जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवण्याचं काम करणारी महिला आणि त्याच शाळेतील एका शिक्षिकेमध्ये वाद झाला. यातून दोघींनी शाळेच्या प्रांगणात अक्षरशः एकमेकींचे केस ओढत मारहाण केली. ही घटना आज शाळेच्या आवारातच घडली असून या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत.
तालुक्यातील जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी शिवणाऱ्या महिलेकडून दर्जदार आहार न देणे, अल्प प्रमाणात खिचडी, बिस्किट देण्याचे प्रकार सातत्याने होतात. यामुळे शाळेतील एका शिक्षिकेने या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पोषण आहार देण्यास सांगितले.
दरम्यान, त्यानंतर खिचडी शिजवणारी महिला त्या शिक्षिके बाबत उलटसुलट चर्चा करत चुकीचे वक्तव्य करत होती. यातच खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेच्या आवारात लघुशंका करत असल्याबाबत ही महिलेने पतीला समज द्यावी असं सांगण्यात आल होत. परंतु सगळा गाव ईथे येऊन तेच करतो ? मग माझ्या पतीमुळे तुला काय त्रास आहे, अस म्हणत शिक्षिकेवरच महिलेने आकस दाखवला होता.
महिला आणि शिक्षिका भिडल्या
दरम्यान, आज खिचडी शिजविणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत हुज्जत घातली. यावेळी शिक्षकेने ही त्या महिलेस तू विद्यार्थ्यांना पुरेसा आहार देत जा असे सांगितले. विद्यार्थ्यांना पुरेसं अन्न देण्याची पुन्हा मागणी केल्याने महिलेने पतीसह शाळे येत शिक्षिकेसोबत वाद घालत मारहाण केली. यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेमध्ये होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
मुख्याध्यापिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारास मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे सांगितलं जात आहे. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पुरेस अन्न विद्यार्थ्यांना देणे आणि यावर नियंत्रण ठेवणे हे मुख्याध्यापिकेचे काम आहे. मुख्याध्यापिका सुद्धा खिचडीमध्ये हात ओले करून घेत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.