Video: म्हाळसजवळ्यात राडा; शिवसेना जिल्हाप्रमुखांसह ३१ जणांविरोधात गुन्हा

By सोमनाथ खताळ | Published: March 14, 2023 05:34 PM2023-03-14T17:34:58+5:302023-03-14T17:35:12+5:30

मारहाणीचा एक कथीत व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

Rada near Mhalasjawala; Case against 31 people including Shiv Sena district chief | Video: म्हाळसजवळ्यात राडा; शिवसेना जिल्हाप्रमुखांसह ३१ जणांविरोधात गुन्हा

Video: म्हाळसजवळ्यात राडा; शिवसेना जिल्हाप्रमुखांसह ३१ जणांविरोधात गुन्हा

googlenewsNext

बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सोमवारी रात्री दोन गट समोरासमोर भिडले. यात काठ्या, धारदार शस्त्रे हाती घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. असे असले तरी दोन्ही गटाकडील लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. परंतू गावात शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होत ३१ जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

यामध्ये यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, गणेश खांडे, बाळासाहेब खांडे, पप्पू शिंदे, ज्ञानेश्वर खांडे, सुशिल खांडे, संदीप खांडे, भागवत खांडे  यांचाही समावेश आहे. दरम्यान, मारहाणीचा एक कथीत व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

दोन्ही गटाकडून तक्रार आली नसल्याचे पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांनी सांगितले तर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले, गावात किरकोळ कारणावरून वाद होत असल्याचे समजले. गावचा प्रमुख या नात्याने माझे जाणे कर्तव्य आहे. मी उलट भांडणे सोडवायला गेलो होतो. मी जर तिथे हजर नसतो, तर काही तरी अनर्थ घडला असता, असे सांगितले.

Web Title: Rada near Mhalasjawala; Case against 31 people including Shiv Sena district chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.