वराह चोरीवरून राडा, दगडफेक अन् तोडफोड; माजी सभापतींवरही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:30 PM2022-03-18T14:30:57+5:302022-03-18T14:32:26+5:30

माजी सभापतींसह २० जणांवर गुन्हा

Radha, stone throwing, vandalism, crimes against former speakers for stealing pigs | वराह चोरीवरून राडा, दगडफेक अन् तोडफोड; माजी सभापतींवरही गुन्हा

वराह चोरीवरून राडा, दगडफेक अन् तोडफोड; माजी सभापतींवरही गुन्हा

Next

बीड : वराह चोरीच्या कारणावरून शिवीगाळ केल्याने शहरातील पेठ बीडमधील बलभीमनगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. यावेळी घरांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड करण्यात आली. तलवारबाजीत काही जण गंभीर जखमी झाले. परस्परविरोधी तक्रारीवरून माजी पालिका सभापती रामसिंग टाक यांच्यासह २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला.

माजी सभापती रामसिंग टाक यांच्या तक्रारीनुसार, बलभीमनगरात १५ रोजी सायंकाळी सहा वाजता शिवीगाळ करून कोयता, विटा, दगड व काठ्यांनी हल्ला चढविण्यात आला. घरावर दगडफेक केली, तर वाहनांची तोडफोड करून तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी सतीश तुसांबड, करण तुसांबड, सागर सौदा, रोहित उर्फ लल्ला सौदा, सुरेंद्र सौदा, शुभम उर्फ गोरा सौदा, मंगल तुसांबड, रेखा सौदा, कपिल सौदा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या गटाकडून सागर सौदा यांनी तक्रार दिली. वराह चोरीवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत दगड, विटांनी घरांवर दगडफेक करून चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरन राजू टाक, कुलदीप टाक, सोनू टाक, प्रदीप टाक, संदीप उर्फ काळू टाक, रामसिंग टाक, अनिता टाक, जागृती टाक व इतर दोन अनोळखी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

तणावपूर्ण शांतता

घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, सपोनि केदार पालवे यांनी भेट दिली. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दोन्ही गटांतील काही जखमींवर उपचार सुरू असून उर्वरित फरार झाले आहेत.

.

Web Title: Radha, stone throwing, vandalism, crimes against former speakers for stealing pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.