संभाजी ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षपदी राहूल वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:14+5:302021-03-26T04:34:14+5:30

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विचारातून संभाजी ब्रिगेड स्थापन करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.मनोज आखरे, ...

Rahul Vaikar as the Divisional President of Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षपदी राहूल वायकर

संभाजी ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षपदी राहूल वायकर

googlenewsNext

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विचारातून संभाजी ब्रिगेड स्थापन करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांनी अ‍ॅड.राहूल वायकर यांची निवड जाहीर केली. अ‍ॅड.राहूल वायकर हे बीड तालुक्यातील आहेर लिमगाव येथील गावपातळीवर राजकारणात सक्रीय होते. पुढे ते बीडमध्ये वास्तव्यास आल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे शाखाध्यक्ष झाले. तेव्हापासून सक्रीयपणे काम करताना बीडचे तालुका कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या पदांवर सक्षमपणे काम केले. गत विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. संभाजी ब्रिगेडचे विचार जनमाणसात पोहचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या सक्रीय कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्र मोरे, प्रवीण ठोंबरे, विजय दराडे यांच्यासह तालुकाध्यक्ष, विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया

संभाजी ब्रिगेडची राजकीय वाटचाल सुरु असली तरी समाजाच्या प्रश्नांवर तडजोड केली जात नाही. सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुरु आहे. पुरुषोत्तम खेडेकर व संभाजी ब्रिगेडचे विचार, कार्य विभागातील सर्व जिल्ह्यातील जनमाणसात पोहचविण्यासाठी मी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे.

-अ‍ॅड.राहूल वायकर, नवनिर्वाचित

विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

===Photopath===

250321\252_bed_18_25032021_14.jpg

===Caption===

रोहूल वायकर संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष 

Web Title: Rahul Vaikar as the Divisional President of Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.