बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटी ताब्यात घेऊन तीन महिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 07:53 PM2019-03-15T19:53:01+5:302019-03-15T19:54:02+5:30
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व बीड शहर पोलिसांनी ही कारवाई संयुक्तरित्या केली.
बीड : शहरातील लक्ष्मणनगर भागातील एका कुंटणखान्यावर छापा टाकून एका आंटीला ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व बीड शहर पोलिसांनी ही कारवाई संयुक्तरित्या केली.
किसनाबाई साहेबराव पवार (६० लक्ष्मणनगर, बीड) असे ताब्यात घेतलेल्या आंटीचे नाव आहे. किसनाबाई ही राहत्या घरातच कुंटणखाना चालवित होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकली. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउपनि भारत माने, राणी सानप, प्रताप वाळके, शेख शमिम पाशा, सतीश बहिरवाळ, निलावती खटाणे, सुरेखा उगले, मिना घोडके आदींनी केली. बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.