हातभट्टीवर धाड, २८ हजारांचे रसायन केले नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:33 AM2021-04-25T04:33:13+5:302021-04-25T04:33:13+5:30
शनिवारी सकाळी ७ वाजता शहर पोलिसांना गौतमनगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या राहत्या घराशेजारी हातभट्टी दारू बाळगून विक्री करीत ...
शनिवारी सकाळी ७ वाजता शहर पोलिसांना गौतमनगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या राहत्या घराशेजारी हातभट्टी दारू बाळगून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तेथे छापा टाकला असता हातभट्टी पिणारे लोक त्याठिकाणी दिसून आले. मात्र, पोलिसांना पाहताच ते पळून गेले. पोलिसांनी तेथे असलेली ३५ लिटर हातभट्टी दारू, तसेच ३०० लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन, असा १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर दुसऱ्या कारवाईत ३५५ लिटर दारू व ४०० लिटर रसायन, असा १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दारू विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड, महिला पोलीस जया रोकडे, सोन्नर, उबाळे, सहायक उपनिरीक्षक शेटे, ठेंगल, तनपुरे आदींनी केली. जया रोकडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश मोतीराम मेंडके व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===Photopath===
240421\purusttam karva_img-20210424-wa0053_14.jpg