साकत शिवारातील गावठी दारू अड्ड्यावर धाड, १८०० लिटर रसायन नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:28 PM2024-04-05T12:28:04+5:302024-04-05T12:28:13+5:30
साकत शिवारात सिनानदीमध्ये झाडाझुडपात अवैद्य गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली.
- नितीन कांबळे
कडा- साकत शिवारातील गावठी दारू अड्ड्यावर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अंभोरा पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी १८०० लिटर रसायनासह दोन लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.
आष्टी तालुक्यातील साकत शिवारात सिनानदीमध्ये झाडाझुडपात अवैद्य गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान अंभोरा पोलिसांच्या पथकाने साकत शिवारात धाड टाकली. यावेळी पोलिसांनी १८०० लिटर रसायन, बॅरल, कॅन व हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख ९० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.
ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, पोलीस हवालदार मुकुंद एकशिंगे, मनोजकुमार खंडागळे, भारत माने, पोलीस नाईक अमोल ढवळे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, अमोल शिरसाठ यांनी केली.