मांजरसुंब्यात कुंटणखान्यावर छापा; आंटीला बेड्या तर दोन महिलांची सुटका
By सोमनाथ खताळ | Published: April 6, 2023 06:40 PM2023-04-06T18:40:42+5:302023-04-06T18:41:17+5:30
मांजसुंबा येथील उड्डाणपुलाच्या बाजुलाच एका पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
बीड : बीड- सोलापूर हायवेवरील मांजसुंबा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारला. यात आंटीला ताब्यात घेण्यात आले असून मांजरसूंबा व नगर जिल्ह्यातील पीडित महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी ३ वाजता केली.जयाबाई व्यंकट लांडगे (वय ५८ रा.मांजरसुंबा ता.बीड) असे आंटीचे नाव आहे.
मांजसुंबा येथील उड्डाणपुलाच्या बाजुलाच एका पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा लावून डमी ग्राहक पाठविण्यात आला. आंटीने पैसे स्विकारता ही कारवाई करण्यात आली. जयाबाई लांडगेविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोह मारोती कांबळे, बाळासाहेब जायभाये, जफर पठाण, संजय जायभाये आदींनी केली.