अंबाजोगाई परिसरात गावठी दारुच्या अड्यावर छापे; २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 03:35 PM2019-04-11T15:35:01+5:302019-04-11T15:36:46+5:30
पथकाने २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करून नष्ट केला.
अंबाजोगाई (बीड ) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याअंबाजोगाई पथकाने बुटेनाथ दरी परिसरात आज सकाळी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून सहा गुन्हे नोंदवले आहेत. यावेळी पथकाने २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करून नष्ट केला.
पथकाने रसायनाने भरलेली ५३ लोखंडी बॅरल, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी १०,९१५ लिटर मळीचे रसायन असा एकूण २,४१,१५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करून नष्ट केला. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाईचे अनिल गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल पिकले, जवान रूपसिंग जारवाल, भागवत पाटील व वाहनचालक डुकरे यांनी केली. गेल्या आठवडाभरातील ही तिसरी कारवाई आहे.