रेल्वे फुल्ल, पुणे-मुंबईहून येण्यासाठी आरक्षण मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:53+5:302021-09-11T04:34:53+5:30

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मुंबई, पुणे या भागातील मूळ रहिवासी असलेले प्रवासी बीड व ...

Railway full, no reservation for Pune-Mumbai! | रेल्वे फुल्ल, पुणे-मुंबईहून येण्यासाठी आरक्षण मिळेना !

रेल्वे फुल्ल, पुणे-मुंबईहून येण्यासाठी आरक्षण मिळेना !

googlenewsNext

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मुंबई, पुणे या भागातील मूळ रहिवासी असलेले प्रवासी बीड व लातूर जिल्ह्यातील गावाकडे येऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पनवेल-नांदेड ही रेल्वे गाडीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या रेल्वे गाडीस दोन दिवसांपासून आरक्षण प्रतीक्षेत आहेत. तसेच ट्रॅव्हल्स व बसला तिकीट दुप्पट झाले आहे. पुण्याहून परळीला येण्यासाठी तेराशे रुपये तिकीट मोजावे लागत आहे. तर मुंबईहून ही परळीला येण्यासाठी ट्रॅव्हल्स तिकीट १६०० रुपये आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या प्रवासास अधिक पसंती दिली आहे.

हैदराबाद मार्गावर गर्दी कमीच ...

हैदराबाद रेल्वे मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी आहे. हैदराबादकडे जाणाऱ्या औरंगाबाद-हैदराबाद या रेल्वे गाडीस प्रवाशांना सहज तिकीट उपलब्ध होत असून, काही डब्यात गर्दीच नाही.

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग ..

परळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी चेहऱ्यावर मास्क लावून येत आहेत. रेल्वे डब्यात सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात आहेत. तसेच रेल्वे पोलीस कर्मचारी कोरोनाविषयक नियमाची जनजागृती करत आहेत.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या

नांदेड- पनवेल,पनवेल - नांदेड काकीनाडा -शिर्डी , शिर्डी - काकीनाडा -सिकंदराबाद -शिर्डी , शिर्डी - सिकंदराबाद, विजयवाडा -शिर्डी , शिर्डी- विजयवाडा, औरंगाबाद- हैदराबाद , हैदराबाद - औरंगाबाद बंगळुरू-नांदेड, नांदेड- बंगळुरू कोल्हापूर-नागपूर, नागपूर - कोल्हापूर , कोल्हापूर -धनबाद, धनबाद-कोल्हापूर, आदिलाबाद -परळी, परळी-आदिलाबाद.

Web Title: Railway full, no reservation for Pune-Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.