रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांची शुक्रवारी परळी रेल्वे स्थानकाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:32+5:302021-07-17T04:26:32+5:30

परळी : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. परळी ...

Railway General Manager Abhay Kumar Gupta visited Parli railway station on Friday | रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांची शुक्रवारी परळी रेल्वे स्थानकाला भेट

रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांची शुक्रवारी परळी रेल्वे स्थानकाला भेट

Next

परळी : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिसराची पाहणी केली.

परळी हे सिकंदराबाद झोनमधील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असल्याने परळीमार्गे रेल्वे गाड्या सुरू करणे व परळी- लातूर रोड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासंदर्भात बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रीतम मुंडे या प्रयत्नशील असून त्यांच्या सूचनेवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बीड जिल्ह्यातील एकमेव व सिकंदराबाद झोनमधील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाचे क्षेत्र असलेल्या परळी येथे देशभरातून भाविक येत असतात. परळी येथून उत्तर भारत व मध्य भारतात जाण्यासाठी नवीन रेल्वे असाव्यात, अशी रेल्वे प्रवाशांतून मागणी होती. बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रीतम मुंडे या परळीतील रेल्वेप्रश्नी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत आल्या असून आज दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांना माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरून निवेदन देण्यात आले. यावेळी गुप्ता यांनी सांगितले की, परळी वैजनाथ रेल्वेे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून याच मार्गावरून जास्तीत जास्त रेल्वे चालू करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

यावेळी निवेदनात हैदराबाद- उदगीर-परळी- सुरत-अहमदाबाद- गांधीधाम., बिदर-उदगीर- परळी- अकोला- अंबाला- जालंधर कॅन्टोनमेंट- जम्मुतवी तसेच मछलीपट्टनम ते बीदर एक्स्प्रेस ही परळीपर्यंत वाढविण्यात यावी, या रेल्वे गाड्या सुरू करण्याबरोबरच नांदेड- बंगळुरू ही हंपी एक्स्प्रेस रेल्वे आदिलाबादपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबरोबरच लातूर रोड ते परळीदरम्यानच्या रेल्वे दुहेरी महामार्गास मान्यता मिळाली असून या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. भाजपच्या वतीने भेटण्यात आलेल्या शिष्टमंडळात सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया, राजेंद्र ओझा, शांतीलाल जैन, राजेश गित्ते, अरुण पाठक, शेख अब्दुल करीम, उमेश खाडे, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, मोहन जोशी, सचिन गित्ते, धनराज कुरील, रमेश गायकवाड, विनायक गडदे, बाबा शिंदे, प्रशांत कराड, अजय गित्ते, विकास हालगे उपस्थित होते.

160721\d21a2c9d-e977-4fdc-95eb-a6c0da47c2d2_14.jpg

Web Title: Railway General Manager Abhay Kumar Gupta visited Parli railway station on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.