पावसाच्या धारेत प्रचार तोफा थंडावल्या, बीड जिल्ह्यात ११५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:46 PM2019-10-19T23:46:56+5:302019-10-19T23:47:36+5:30

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने सभा आयोजकांची फजिती झाली.

In the rain stream, propaganda guns are cooling, in the Beed district, 4 candidates are in the fray | पावसाच्या धारेत प्रचार तोफा थंडावल्या, बीड जिल्ह्यात ११५ उमेदवार रिंगणात

पावसाच्या धारेत प्रचार तोफा थंडावल्या, बीड जिल्ह्यात ११५ उमेदवार रिंगणात

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक। परळीत बहिण-भाऊ तर बीडमध्ये चुलते- पुतणे निवडणूक रिंगणात; बीडमध्ये सर्वाधिक, तर आष्टीत सर्वात कमी उमेदवार, प्रशासन सज्ज

बीड : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने सभा आयोजकांची फजिती झाली. तर काही ठिकाणी भर पावसात नेत्यांच्या भाषणांचा श्रोत्यांनी आनंद घेतला. जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात ११५ उमेदवार असून परळीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात चुरशीचा सामना होत आहे तर बीडमध्ये चुलते जयदत्त क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर एकमेकाच्या विरोधात आहेत. बीडमध्ये शिवसेना- राष्टÑवादी कॉँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीसह अन्य उमेदवार तर अन्य पाच मतदार संघात भाजपविरुद्ध राष्टÑवादी कॉँग्रेससह इतर उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बीडमध्ये सर्वाधिक ३४ तर आष्टीत सर्वात कमी ९ उमेदवार आहेत.
आष्टी मतदार संघात ९ उमेदवार
जिल्ह्यातील सहा पैकी विधानसभा मतदार संघापैकी सर्वात कमी ९ उमेदवार आष्टी मतदार संघात आहेत. येथे भाजपचे भीमराव धोंडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे बाळासाहेब आजबे, वंचित बहुजन आघाडीचे नामदेव सानप यांच्यासह इतर ६ उमेदवार मैदानात आहेत.
माजलगावात २५ उमेदवार
माजलगाव विधानसभा मतदार संघात भाजपचे रमेश आडसकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रकाश सोळंके, वंचित बहुजन आघाडीचे धम्मानंद साळवे, एमआयएमचे शेख अमर जैनोद्दीन यांच्यासह २१ उमेदवारांचा समावेश आहे.
गेवराईत १९ उमेदवार
गेवराई मतदार संघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे अ‍ॅड. लक्ष्मण पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे विजयसिंह पंडित, अपक्ष बदामराव पंडित या प्रमुख उमेदवारांशिवाय १६ उमेदवार मैदानात आहेत.
केजमध्ये १२ उमेदवार
केज विधानसभा मतदार संघात भाजपच्या नमिता मुंदडा, राष्टÑवादी कॉँग्रेसचे पृथ्वीराज साठे, वंचित बहुजन आघाडीचे वैभव स्वामी यांच्यासह ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
परळीत बहीण -भावात लढत
परळी मतदार संघात भाजपच्या पंकजा मुंडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे भीमराव सातपुते, यांच्यासह १६ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.
बीडमध्ये सर्वाधिक ३४ उमेदवार
बीड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ३४ उमेदवार असून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे संदीप क्षीरसागर, एमआयएमचे अ‍ॅड. शेख शफीक, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात प्रमुख लढतीचे चित्र आहे. इतर ३० उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.

Web Title: In the rain stream, propaganda guns are cooling, in the Beed district, 4 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.