बीड जिल्ह्यात पावसाची ओढ; कडधान्याचा उतारा ४० टक्के येणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:35 AM2019-08-15T00:35:20+5:302019-08-15T00:35:45+5:30

जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.

Rainfall in Beed district; Cereal extract will be 5% less | बीड जिल्ह्यात पावसाची ओढ; कडधान्याचा उतारा ४० टक्के येणार कमी

बीड जिल्ह्यात पावसाची ओढ; कडधान्याचा उतारा ४० टक्के येणार कमी

googlenewsNext
ठळक मुद्देमूग, उडीद इतर कडधान्याचे क्षेत्र घटले : पुढील काळात पाऊस न पडल्यास कापूस, सोयाबीन पिकांना धोका

बीड : जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, पुढील काळात पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्य पिक असलेल्या कापूस, सोयाबीनवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचसोबत मूग, उडीद व इतर कडधान्याच्या उत्पादनात घट होऊन उतारा कमी येणार असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामात यावर्षी तुरळक पावसावर कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा शेतकऱ्यांनी केला होता. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयबीन व कापूस या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्याचसोबत गतवर्षीच्यापेक्षा जवळपास ५ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांचा पेरा कमी झाला आहे. जुलै ते आॅगस्ट महिन्याच्या कालावधीत तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही पिकांना जिवनदान मिळाले आहे. मात्र, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांवर परिणाम जाणवत आहे. सोयबीन फुलोºयात आहे मात्र, पाणी कमी पडत असल्यामुळे फुले गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ऐकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत दरवर्षी जवळपास ६० हजार क्षेत्रावर कडधान्याचा पेरा केला जातो. या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यावर्षी घट झाली आहे. तसेच कडधान्याची पिकं ही ६० दिवसांची असल्यामुळे आता फुले व काही ठिकाणी शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कालावधीत पाण्याची आवश्यता आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे कडधान्यच्या उत्पादनात अंदाजे ४० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील काळात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सर्वच पिकांच्या उपत्पादनात घट होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकरी पिके जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Rainfall in Beed district; Cereal extract will be 5% less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.