दरवर्षी पर्जन्यमान घटत चालल्याने गेवराई तालुक्यात पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:39 AM2019-08-11T00:39:32+5:302019-08-11T00:40:02+5:30
गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता.
गेवराई : गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कमी पाऊस पडत असल्याने व पिकेच चांगली येत नसल्याने या दुष्काळामुळे येथील कापूस जिनिंग व्यवसाय डबघाईला आल्याने हजारो बेरोजगाराला कामे नाहीत तर अनेक जिनिंग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
बीड जिल्ह्यात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस उत्पन्नात गेवराई तालुका हा नेहमी बीड जिल्ह्यात आघाडीवर होता. तालुक्यात जवळपास २९ जिनिंग असून, या जिनिंगमार्फत तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात होता. त्यामुळे शेतकºयाला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाप्रमाणे पैसे मिळत होते. यात गेल्या वर्षी तालुक्यातील जवळपास १५ जिनिंगमार्फत कापूस खरेदी झाली. याची किमंत कोटीच्या घरात होत होती. मात्र हे उत्पन्न गेल्या पाच ते सहा वर्षांत घटत चालले असल्याने यात निम्म्यापेक्षा जिनिंग अनेक वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने व कापूस पिके निघत नसल्याने बंद आहेत. या सर्व जिनिंगवर तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील तसेच राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातील हजारो नागरिकांच्या कुटंबाला येथे सात ते आठ महिने रोजगार मिळत होता. आता दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस देखील निघणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे यावर्षी सुध्दा काही ठराविक जिनिंग चालु होतील. तसेच अजून काही भागात चांगला पाऊस पडला नसल्याने कापसाची पिके इतभर देखील वाढली नाहीत, त्यामुळे या वर्षी देखील कापूस उत्पन्नात मोठी घट तर होईलच मात्र मोजक्याच कापूस जिनिंग चालू राहिल्यास स्थानिक व बाहेरील राज्यातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न आ करून उभा राहणार आहे. तो कसा सोडवता येईल, असा प्रश्न कामगारांपुढे पडला असल्याचे खळेगाव येथील शेतकरी मनोज शेंबडे यांनी सांगितले आहे. परराज्यातील तसेच स्थानिक व्यापाºयांनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रूपये खर्च करून कापूस जिनिंग उद्योग सुरू केला. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिनिंग तसेच कापूस उत्पादनावर आधारित व्यवसाय डबघाईला आल्या असल्याचे चित्र आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून १० ते १२ जिनिंग चालुच झाल्या नाही, त्या आजही बंद आहेत.यात करोडो रूपये गुंतले असल्याचे येथील व्यापारी यांनी सांगितले.